<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-</strong></p><p>तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तब्बल २१३८ अर्ज दाखल करण्यात होते. आज( गुरुवारी) संकाळी ११ वाजेपासून प्रशासनाकडून इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी केली, त्यात कागदपत्रांची अपूर्णता; असलेले ३२ अर्ज अवैध ठरविण्यात आले.</p> .<p>तर २१०६ अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता ७६ ग्रामपंचायतीसाठी २१०६ इच्छुक उमेदवार रिंगणात आहेत. परंतू वैध ठरलेल्या अर्जांपैकी माघारीसाठी लोकप्रतिनिधीकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे तालुकावसियांचे लक्ष आता उमेदवारांच्या माघारीकडे लागले आहे.</p>