बीएचआरच्या अवसायकपदी चैतन्य नासरे रुजू

सील उघडण्याच्या परवानगीसाठी न्यायालयात अर्ज करणार
बीएचआरच्या अवसायकपदी चैतन्य नासरे रुजू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील एमआयडीसीत मुख्य कार्यालय असलेल्या तसेच घोटाळ्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह संस्थेच्या अवसायकपदी नागपूर हिंगणा येथील सहनिबंधक चैतन्य नासरे यांनी सोमवारी रूजू झाले मात्र त्यांनी कार्यालय सील असल्याने अद्याप पदभार स्विकारला नाही.

बहुचर्चित असलेल्या बीएचआर संस्थेतील अपहारप्रकरणी चेअरमनसह संचालकाविरोधात गुन्हे दाखल आहेत. ते सद्यस्थितीत कारागृहात आहेत.

जिल्हा न्यायालयात त्याच्यावर दोषारोपत्र ठेवण्याची कार्यवाही सुरु आहे. तर दुसरीकडे पुणे येथे विविध पोलीस ठाण्यात बीएचआरपतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी करुन जळगावातील सहा जणांना अटक केली आहे ते कारागृहात असून त्यापैकी पाच जणांविरोधात पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारे व सुनील झंवर हे फरार आहेत.

जितेंद्र कंडारे संशयित असल्याने याठिकाणी अवसायक नियुक्त करण्याची मागणी होती. त्यानुसार रिक्त असलेल्या अवसायक पदी सहकार विभागाने चैतन्य नासरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

शासनाच्या आदेशानुसार आज सोमवारी चैतन्य नासुरे यांनी बीएचआर पतसंस्थेच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात अवसायकपदी रुजू झाले. आज त्यांनी येथील कर्मचार्‍यांकडून आढावा घेतला.

सील उघडण्यासाठी न्यायालयाला अर्ज करणार

दरम्यान बीएचआर घोटाळ्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करुन बीएचआर पतसंस्थेच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयाला सील ठोकले आहे. हे सील उघडण्यास परवानगी द्यावी, यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहे.

तसेच यापूर्वी पुणे आर्थिक गुन्हे शाखेला सील उघडण्याबाबत विनंती करण्यात येणार येणार आहे. यानंतर बीएचआरच्या कामाकाजाला सुरुवात करण्यात येईल, असे चैतन्य नासुरे यांनी बोलतांना सांगितले.

दरम्यान चैतन्य नासुरे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून ते नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे सहनिबंधक म्हणून रुजू झाले होते. ही त्यांची पहिलीच पोस्टींग होती. आता यानंतर ते आज बीएचआरच्या अवसायकपदी रुजू झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com