जिल्ह्यात अडीच लाख बालकांची होणार तपासणी

जिल्ह्यात अडीच लाख बालकांची होणार तपासणी

कुपोषण निर्मुलनासाठी सीईओंचे निर्देश; तीन आठवड्यात मागविला अहवाल

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोना महामारीच्या कार्यकाळात लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाल्याने मजुरांना अर्ध्यापोटी राहण्याची वेळ आली असल्याने बालकांमध्ये कुपोेषणाचे प्रमाण वाढले असून जिल्ह्याला कुपोषणाच्या मगरमिठ्ठीतून सोडविण्यासाठी जिल्ह्यात शून्य ते 5 वयोगटातील 2 लाख 49 हजार 893 बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

कुपोेषण निर्मूलनासाठी जिल्ह्यात अंगणवाडीसेविका, आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्तविद्यमाने शून्य ते 5 वयोगटातील जिल्ह्यात अडीच लाख बालकांची वैद्यकीय तपासणी पथकामार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यात बालकांची करुन तपासणीदरम्यान कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्याचा अहवाल सीईओंना सादर करण्यात येईल.

आर.आर.तडवी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग जळगाव

याबाबत 21 जूनला दै. देशदूतने जिल्ह्यात कुपोषणाची मगरमिठी या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशिक केले होते. त्याची दखल सीईओंनी घेत अंगणवाडीसेविका आणि वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी महिला व बालकल्याण विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आरोग्य व कुपोषण निर्मूलनाला प्रथम प्राधान्य देत विभागनिहाय आढावा घेण्याचे काम सुरु आहे.

महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.आर.तडवी यांच्याकडून जि.प.महिला व बालकल्याण विभागाची माहिती जाणून घेत शून्य ते 5 वयोगटातील बालकांची वैद्यकीय तपासणी करुन बालकांचे वजन, उंची मोजून कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच वैद्यकीय उपचारासह सकस आहार देण्याचे निर्देश सीईओ डॉ.आशिया यांनी दिले. तसेच तीन आठवड्यात ही मोहीम राबवून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

वैद्यकीय पथक-अंगणवाडीसेविकांवर मदार

जळगाव जिल्ह्यात 3 हजार 640 अंगणवाड्या कार्यान्वित असून 3 हजार 483 अंगणवाडीसेविकांची पदे मंजूर आहेत. त्यात 3 हजार 339 अंगणवाडीसेविका कार्यरत असून 157 पदे अंगणवाडीसेविकासेविकांची रिक्त आहेत. जिल्ह्यात कुपोषणाचे निर्मूलन करण्यासाठी अंगणवाडीसेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील तालुकानिहाय वैद्यकीय पथक यांच्या संयुक्तविद्यमाने जळगाव जिल्ह्यात 2 लाख 49 हजार 893 बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

जामनेर तालुक्यात सर्वाधिक 30 हजार 595 तर बोदवड तालुक्यात सर्वात कमी 6 हजार 686 बालकांची संख्या आहे. जिल्ह्यात शून्य ते 5 वयोगटातील बालकांची वैद्यकीय तपासणीची मदार वैद्यकीय पथक आणि अंगणवाडीसेविकांवर राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com