केंद्रीय समितीने केली कोविड रुग्णालयात पाहणी
जळगाव

केंद्रीय समितीने केली कोविड रुग्णालयात पाहणी

पदाधिकार्‍यांकडून कौतिकनगर परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

कोरोनाच्या संसर्गाबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात पाहणी करुन आरोग्य सेवा, उपाययोजना आदीबाबत आढावा घेतला. तसेच या समितीने शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची देखील पाहणी केली.

कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती शहरात आलेली आहे. या समितीने कोविड रुग्णालयांमधील रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. समितीने या रुग्णालयातील काही समस्या, रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच औषधोपचार, उपाययोजनांबाबत संबंधित अधिकार्‍यांना काही सूचना केल्या. या वेळी समितीमधील अधिकारी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, आयुक्त महापालिकेचे सतीश कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, डॉ.दत्तात्रय बिरादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.राठोड आदी उपस्थित होते.

प्रतिबंधित क्षेत्रातील पाहणी

या समितीमधील अधिकारी, पदाधिकार्‍यांनी कौतिकनगर परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. समितीने या भागात प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. या वेळी समितीमधील अधिकारी, पदाधिकारी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, इन्सीडेंट अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण आदी उपस्थिती होते.

Deshdoot
www.deshdoot.com