मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

देशात बेरोजगारी वाढली : कॉंग्रेसचा आरोप
बेरोजगार दिनानिमित्त निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारी
बेरोजगार दिनानिमित्त निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारीभुसावळ

भुसावल Bhusawal (प्रतिनिधी)

दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासुन करोडो जनतेचे रोजगार गेले आहेत सामन्या माणसाला यांच्या भाषणा शिवाय काही मिळत नाही. म्हणूून कॉंग्रेसच्या वतीने त्याचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा कण्यात आला.

सामान्य जनता हतबल झाली आहे, हाताला काम व पोटाला भाकर न मिळता, नोटा बंदीने देशाचे आर्थिक नुकसान झाले. अनेक शासकिय कंपण्याची विक्री करुन खाजगीकरण करण्याचा डाव होताना दिसत आहे. पंतप्रधानांच्या काळात न्यायाधिशाने पत्रकार परीषद घ्यावी येवढे दुर्दैवाने लोकशाहीत घडताना दिसले. आज जिडीपी घसरली आहे, देशाची आर्थिक बाजु नाजुक झाली असुन रोजगार निर्मितीकडे पंतप्रधानानी लक्ष देण आवश्यक होते परंतु रोजगार निर्मितीकडे दुर्लक्ष करुन वेगवेगळे वाद निर्माण करणे, माणसात फुट पाडुन भांडणे लावणे हाच प्रोग्राम सध्या देशात दिसत असुन करोडो तरुणाची फसवणुक झाल्यामुळे आज देशाचे बारा वाजले आहेत म्हनुन पंतप्रधात नरेद्र मोदी यांच्या वाढदिवस निषेधात्मक, बेरोजगार दिवस साजरा साजरा करण्यात आला यावेळी युवक कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख ईमरान खान ईद्रीस खान, शहराध्यक्ष रविंद्र निकम, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुनव्वर खान, प्रदेश संयोजक भगवान मेढे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलीम गवळी, शहर उपाध्यक्ष विलास खरात, संतोष साळवे, महेंद्र महाले, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे, सुकदेव सोनवणे, अन्वर तडवी जॉनी गवळी, महीला जिल्हा सचिव राणी खरात, जिल्हा महिला उपाध्यक्ष हमिदा गवळी, अकिल शहा पदधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com