जळगावातील बड्या व्यावसायीकावर सीबीआय व आयकर विभागाचा छापा

शहरात खळबळ ,व्यवसायिकांमध्ये भीती
जळगावातील बड्या व्यावसायीकावर सीबीआय व आयकर विभागाचा छापा

जळगाव - Jalgaon :

शहरातील एका बड्या व्यावसायिकावर मंगळवारी रात्री सीबीआय व आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आज दिवसभर याच विषयाची चर्चा होती.मात्र दुजोरा मिळू शकला नाही.शहरातील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेल्या एका बड्या व्यावसायिकाने मध्यप्रदेशमध्ये रेल्वेच्या कंटेनरचा ठेका घेतला आहे.

दरम्यान त्या व्यावसायिकावर मंगळवारी रात्री कारवाई झाल्याची चर्चा आज दिवसभर रंगली होती. ही कारवाई आयकर विभाग, सीबीआय किंवा एफसीआय विभाग यापैकी कोणी केली याची नेमकी माहिती कळू शकली नाही.

ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडीत असलेला हा उद्योजक असल्याने त्यांचे अनेकसोबत व्यवहार आहेत. त्यामुळे हे पथक अजून कोण कोणत्या व्यावसायिकांवर छापा टाकणार याकडे आता लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com