कोविडग्रस्तांना जुने आजार असल्यास दक्षता आवश्यक

‘कोविड आणि जुने वैद्यकीय आजार’ विषयावरील चर्चासत्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
कोविडग्रस्तांना जुने आजार असल्यास दक्षता आवश्यक
USER

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोविड संक्रमण काळात, कोविड झालेला असताना आणि कोविड पश्चात जुने वैद्यकीय आजार असलेल्यांनी अधिकची दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

त्रिसूत्रीचा उपयोग करून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. जुने आजार असलेल्यांनी आपल्या आजाराची माहिती देत वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास पुढील उपचार करणे सोपे जाते, असा सल्ला जळगाव शहरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञांनी दिला.

आयएमए जळगावतर्फे शुक्रवारी दि.21 कोविड- 19 आणि जुने वैद्यकीय आजार या विषयावर आज तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्रात प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.किरण मुठे, मेंदू विकार विशेषज्ञ डॉ.सुनील गाजरे, इंटेनसिविस्ट तथा कोविड टास्क फोर्स सदस्य डॉ.राहुल महाजन, किडनी विकार तज्ञ डॉ.अमित भंगाळे हे सहभागी झाले होते. यावेळी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी, सचिव डॉ.राधेश्याम चौधरी उपस्थित होते.

मधुमेह, हृदयविकाराच्या रुग्णांनी सीआरपी चाचणी करून लस घ्यावी

आपल्याला इतर आजार असल्यास कोरोनामुळे शरीरावर अधिकचा भार पडतो त्यामुळे गुंतागुंत वाढते. उपचार करताना अडचणी येतात. आजवर जेमतेम 3 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांमध्ये गैरसमज अधिक आहे. सीआरपी लेव्हल अधिक असेल तर लसीमुळे त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. सीआरपी नियंत्रणात आणण्यासाठी काही औषधी घ्यावी लागतात. लस घेतल्यास पुढील धोका टाळता येतो. कोविड पश्चात मधुमेह, हृदयविकार असलेले रुग्ण दवाखान्यात जाणे टाळतात. रुग्णांनी डॉक्टर आणि रुग्णालयांची यादी तयार करून ठेवावी, असे डॉ.किरण मुठे यांनी सांगितले.

चिंता आणि नैराश्याने इतर आजार बळावतात

मायग्रेनचे प्रमाण वाढले आहे. चिंता, नैराश्यामुळे डोके दुखी, अंग दुखी होण्याचे प्रमाण वाढले. काहींना अधिक झोप लागते तर काहींना कमी झोप लागत आहे. झोपेचा ताळमेळ खराब झाला आहे. ब्रेल्स पालसी सारख्या मेंदूकडून येणार्‍या नसांच्या पक्षघाताचा धोका वाढला आहे. म्युकोरमायकोसीसचे रुग्ण वाढले आहे. कोरोनात रक्त घट्ट होते त्यामुळे पक्षघात, लकवा होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे डॉ.सुनील गाजरे यांनी सांगितले.

साखरेचे नियंत्रण म्युकॉरमायकॉसिस टाळू शकते

कोरोनामुळे शहरातील स्वादुपिंडाला बाधा पोहोचवतो त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते, तणाव आणि स्ट्रेरॉईडमुळे देखील शरीरातील साखर वाढते. मधुमेहाच्या रुग्णांनी वेळोवेळी साखरेचे प्रमाण तपासून घ्यावे. इन्सुलिन घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच जलनेती केल्याने म्युकोरमायकोसीसचा धोका टाळता येतो. असे डॉ.राहुल महाजन यांनी सांगितले.

किडनीवर प्रभाव पडल्याने डायलिसिसचे प्रमाण वाढू शकते

कोविडमुळे किडनीवर ताण पडतो त्यामुळे किडनीचे आजार बळावतात. लघवीचे प्रमाण कमी होणे, क्षार संतुलन खालावते त्यामुळे औषधींमध्ये बदल करावे लागतात. बर्‍याचवेळा रुग्णांना डायलेसीसची गरज भासते. डायलिसिसच्या रुग्णांना कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. असे डॉ. अमित भंगाळे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com