सावधान... रात्रीही होणार अतिक्रमण पथकाची कारवाई

सावधान... रात्रीही होणार अतिक्रमण पथकाची कारवाई

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागातर्फे तीन दिवसापासून रात्री अतिक्रमण पथकाची गस्त तैनात करण्यात आली आहेत.

शासकीय आदेशानुसार रात्री 11 ते 6 जनता कर्फ्यू राज्यभरासह शहरात लागू केलेला आहे. या दरम्यान शहरात काही अप्रीय घटना घडू नये यासाठी मनपातर्फेही कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी मनपाचे एक रात्रीचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले असून रात्री हे पथक 11 पासून कार्यान्वित होते.

शहराच्या जिते रात्रीची रेलचेल असेल किंवा असण्याची माहिती मिळाली तेथे हे पथक जात असते. शहरातील हायवे रस्त्यासह गणेश कॉलनी, अजिंठा चौफुली ते शिवकॉलनी चौक व शहरातील मध्यवर्ती ठिकाणी व इतर परिसरात पथक गस्त घालत आहे. 5 जानेवारी 2021 पयर्र्त हे पथक तैनात राहील. दिवसा अतिक्रमण पथकामार्फत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तर कार्यवाही होतच असते. मात्र आता रात्रीही कारवाई मनपाच्या या पथकातर्फे सुरु झाली आहे.

अप्रिय घटनांना अटकाव

अतिक्रमण निर्मूलन पथकाची ही पोलिसांपैकी गस्त रात्री असल्याने रात्री होणार्‍या काही अव्यवहारिक बाबींसह अप्रीय घटनांना अटकाव बसणार आहे. साहजिकच आपोआप या बाबीस आळा बसणार आहे. नागरिकांकडूनही या पथकाच्या कामगिरीमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पथकात यांचा समावेश

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे संजय ठाकूर, मुकादम ज्ञानेश्वर (नाना) कोळी, नितीन भलेराव, शेखर ठाकूर, नरेन गायकवाड, हिरामण बाविस्कर, दीपक कोळी आदींचा या पथकात समावेश आहे. शहर मनपा क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन व मनपातर्फे हे पथक तयार करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com