विनापरवाना रेशनच्या गहू, तांदूळाची वाहतूक करणारा ट्रक पकडला

एमआयडीसी पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल
विनापरवाना रेशनच्या गहू, तांदूळाची वाहतूक करणारा ट्रक पकडला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

काळ्या बाजारात जात असलेला रेशनच्या धान्यादी मालाचा ट्रक बुधवारी तांबापुर्‍यात सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पकडला. यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पुरवठा तपासणी अधिकारी यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना तांबापुरा परिसरातून शासकीय मालकीचा गहू व तांदूळाने भरलेला माल आयशर गाडीत भरून नेत असल्याचे दिसून आले. गुप्ता यांनी वाहन थांबवून वाहनांची चौकशी केली. एमएच 17 एजी 7330 क्रमांकच्या आयशर गाडीला थांबवून

तपासणी केली असता वाहनांमध्ये 131 गव्हाचे कट्टे व 141 तांदळाचे कट्टे असे आढळून आले. यासंदर्भात चालकाला घेऊन जाण्याचा पावती दाखवण्यास विचारपूस केली असता चालक शेख अन्वर उर्फ बबलू शेख गफार (रा. पाळधी ता.धरणगाव जि.जळगाव) हा वाहन सोडून फरार झाला आहे.

दरम्यान वाहनांची अधिक चौकशी केली असता धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील वार्ड क्रमांक 38/1 मधील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 68चे मालक शेख अहमद शेख निसार यांनी हा माल आपला असल्याचे सांगितले. शासकीय धान्य दुकानाचे बिल पावती मागणी केली असता बिल पावती नसल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तरे दिली. विना परवाना धान्यादी मालाची वाहतूक होत असल्याचे समोर आल्यानंतर पुरवठा

तपासणी अधिकारी दिगंबर भिकन जाधव (वय-51 रा. रायसोनी नगर) यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी दिगंबर जाधव यांच्या फिर्यादीवरून चालक शेख अन्वर उर्फ बबलू शेख गफ्फार आणि दुकान मालक शेख अहमद शेख निसार दोन्ही रा. पाळधी ता. धरणगाव यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com