चाळीसगावात शनिवारी भरणार गुरांचा बाजार

भुईमुग शेंगांचा लिलावही आजपासून सुरु
चाळीसगावात शनिवारी भरणार गुरांचा बाजार

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी गेल्या दिड महिन्यांपासून लॉकडाऊनच्या काळात येथील कृषी उत्पन्न समितीच्या आवारात भरणारा गुरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. परंतू आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने मुख्यप्रशासक दिनेश पाटील यांच्यासह संचालक मंडळाने गुरांचा बाजार सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र देवून विनंती केली होती. या पत्राची दखल घेत गुरांचा बाजार भरवण्यास जिल्हाधिकारी यांनी परवागी दिली आहे. त्यामुळे उद्या (शनिवार) कृउबा समितीच्या आवारात नेहमीप्रमाणे गुरांचा बाजार भरणार आहे. ऐन पेरणीच्या काळात गुरांचा बाजारा भरणार असल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून बैलजोडी व इतर गुरांचा खरेदी-विक्रीचा मार्ग मोकला झाला आहे.

भुईमुग शेगांचा लिलावही सुरु

चाळीसगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही वर्षांपासून भुईमुग शेंगांची लिलाव पध्दत बंद झाली होती. विद्यमान संचालक मंडळाला शेतकर्‍यांनी भुईमुगाची खरेदी बाजार समितीत करावी अशी मागणी निवेदनाव्दारे प्रशासक मंडळाकडे केल्यानंतर मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी आम्ही प्रशासक मंडळाचा कारभार हाती, घेवून दोनच महिने झालेले आहेत.

गेल्या दोन वर्षापूर्वी भुईमुगाची लिलाव पध्दत बंद पडलेली होती. ती पुन्हा सुरु करण्यासाठी आमचे या आधीपासून प्रयत्न असल्याचे सांगत, त्यासाठी भुईमुंग खरेदीची जागा निश्चित करुन तेथे शेड बांधकाम देखील पूर्ण झालेले आहे. येत्या शुक्रवार पासून भुईमुगाची लिलाव पध्दत आम्ही सुरु करणार असल्याचे आश्वासन निवेदन देणार्‍या शेतकरर्‍यांना दिले होते. त्यानुसार आजपासून बाजार समितीत आज शुक्रवार पासून भुईमुगाची लिलाव पध्दतीने खरेदी प्रक्रीया सुरु झाली आहे. आज बाजार समितीत शेतकर्यांनी आणलेल्या भुईमुगाचा लिलावा होवून ४५०० ते ५१०० रुपये भाव मिळाल्याचे मुख्यप्रशासक दिनेश पाटील यांनी सांगतांनाच लॉकडाऊनच्या काळात बंद असलेला बाजार समितीतील गुरांचा बाजार देखील उद्या शनिवारपासून सुरु करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com