राष्ट्रीय महामार्गावर कार उलटली

सुदैवाने दोघे मित्र बालंबाल बचावले
राष्ट्रीय महामार्गावर कार उलटली

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सुरतकडे जात असलेल्या कारच्या उजव्या बाजूचा नटबोल्ट निघून चाक निघण्यापूर्वी कारवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे कारअपघाताची घटना सुदैवाने टळून कारमधील दोघेही मित्र बचावले आहे.

ही घटना शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्कजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जळगाव येण्यापूर्वीही यवतमाळ जिल्ह्यात या कारचा कार उलटून अपघात झाला होता. दोन अपघात होवूनही दैव बलवत्तर म्हणून दोघं मित्रांना कुठलीही इजा झाली नसल्याची बाबसमोर आली.

सुरत येथील भरतभाई अंबाबाई सुकरिया हे त्यांचा मित्र हर्षदभाई गाभानी यांच्यासोबत कारने (क्र. जी.जे.05 सीडी 4355) यवतमाळ जिल्ह्यात कंपनीच्या कामासाठी गेले होते. काम आटोपून दोघेही बुधवारी सुरतकडे निघाले.

यादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील धोरेफेल गावाजवळ कार खड्डयात जावून रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात कारच्या पुढच्या तसेच मागच्या बाजूच्या काचा फुटून नुकसान झाले. त्यानंतर आहे त्या स्थितीत कार घेवून ते पुन्हा सुरतकडे निघाले.

दि. 13 नोव्हेंबर रोजी ते जळगावात पोहचले. जळगाव शहरातून जात असतांना शुक्रवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्कजवळ कारच्या उजव्या बाजूच्या चाकाजवळील नटबोल्ट निघाला. कारचे चाक निघळून बाहेर पडणार तोच चालकाने नियंत्रण मिळवून कार दुभाजकाच्या बाजूला थडकली.

कार वेगात असती, तर मोठी दुर्घटना घडली असती, मात्र कारचा वेग कमी असल्याने कारवर नियंत्रण मिळविता आले, असे सुकरिया यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com