कार-दुचाकीचा अपघात ; चौघे ठार, एक गंभीर

मयतांमध्ये वाघडू येथील एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश
 कार-दुचाकीचा अपघात ; चौघे ठार, एक गंभीर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील रोहिणी गावाजवळ हॉटेल नक्षत्र (Hotel Nakshatra) जवळ दुचाकी व चारचाकी वाहनाची समोरा-समोर धडक झाली. या भीषण अपघातात (Accident) दोन जण जागीच ठार, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तर एक लहान मुलगा गंभीर जखळी असून त्यांची परिस्थिती नाजूक आहे. मृतांमध्ये एका गरोदर महिला, दोन पुरुष, एक मुलगीचा समावेश आहे. तालुक्यातील वाघडू येथील एकाच कुंटुबातील चार जण मयत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यात दुचाकीवरील सर्वांचा मृत्यू झाला आहे. तर (Swift car) स्वीप्ट कारमधील दोघे जखमी झाले आहेत. सर्वांचे मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी दाखल करण्यात आले आहे. तर मयातांची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com