तणावातून व्यावसायिकाची आत्महत्या

तणावातून व्यावसायिकाची आत्महत्या

आर्थिक विवंचनेत पंख्याला ओढणी बांधून संपविले जीवन

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

फुले मार्केटमध्ये व्यवसायावर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई झाली. ही कारवाई तसेच आर्थिक विवंचनेत असलेल्या संजय मुधलदास चिमरानी (वय 35, सिंधी कॉलनी, बाबानगर) या हॉकर्सने राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची आज शनिवारी सकाळी 6 वाजता समोर आली आहे.

संजय चिमरानी हे फुले मार्केटमध्ये रेडीमेड कपडे विक्रीचा व्यवसाय करीत होते. दरम्यान, कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये व्यवसाय पुर्णपणे बंद होता. अनलॉक झाल्यानंतर काही दिवस व्यवसाय केला.

यादरम्यान अतिक्रमण पथकाने काही दिवसांपूर्वी फुले मार्केटमधील हॉकर्सवर दंडात्मक कारवाई केली. यात चिमरानी यांच्यावर कारवाई होऊन त्यांचा माल देखील जप्त करण्यात आला आहे. हा माल परत मिळणार नसल्यामुळे ते आर्थिक तणावात होते.

शिवाय पुन्हा व्यवसाय सुरू करणे त्यांना शक्य होणार नव्हते. यामुळे काही दिवसांपासून ते प्रचंड तणावात होते. अशातच शुक्रवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधुन गळफास घेत आत्महत्या केली. अशी माहिती माजी नगरसेवक अशोक मंधान यांनी बोलतांना दिली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर माजीनगरसेवक अशोक मंधान यांच्यासह कुटुंबीय, शेजार्‍यांनी चिमरानी यांचा मृतदेह उतरवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

मुलांना शीतपेय आणून दिले अन् संपविले जीवन

मनपाने कारवाई करुन माल जप्त केला. यामुळे पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासह आर्थिक समस्या, यातच मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे होते. शुक्रवारी रात्री त्यांनी दोन्ही दोघांना शितपेय आणून दिले.

त्यांची मुले व पत्नी घराबाहेर शेजारील महिलांसोबत गप्पा मारत असतांना घरात एकट्या असलेल्या चिमरानी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. चिमरानी यांच्या पश्चात पत्नी कांचन व दक्ष व लक्ष अशी दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com