यावल पंचायत समितीने घेतली वेबिनार द्वारे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा

अरुण भांगरे यांचे लाभले मार्गदर्शन
यावल पंचायत समितीने घेतली वेबिनार द्वारे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा

यावल - प्रतिनिधी Yaval

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जळगाव व शिक्षण विभाग पं.स.यावल यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन बाबत मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. सदर सभेसाठी सरस्वती विद्यामंदिर, यावल, शारदा विद्यालय साकळी व भुवनेश्वरी माध्यमिक विद्यालय मनवेल शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

या सर्व विद्यार्थ्यांना डॉ नरेंद्र महाले सरस्वती विद्यामंदिर, यावल यांनी प्रास्तावीक मार्गदर्शनात विषयाचे महत्व समजवुन दिले.तर अरुण भांगरे संपर्क अधिकारी तथा अधिव्याख्याता डायट जळगांव यांनी विदयार्थाना व्यवसाय मार्गदर्शन व महाकरियर पोर्टल वर नोंदणी संदर्भात सूचना देवून मार्गदर्शन केले.

महेश जंगले समुपदेशक भारत विद्यालय न्हावी यांनी व्यवसाय निवडीच्या विविध अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देऊन महाकरियर पोर्टल वर विद्यार्थ्यांनी नोंदणी कशी करावी वआपली आवड कोणत्या अभ्यासक्रमात आहे हेओळखुन अभ्यासक्रमात अँडमिशन घ्यावे म्हणजे पुढील आयुष्य सुखकर होईल असे सखोल मार्गदर्शन केले .

तसेच सभेच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी नईमशेख ,शिविअ विश्वनाथ धनके ,केंद्रप्रमुख विजय ठाकूर, किशोर चौधरी व सर्व साधन व्यक्ती गट साधन केंद्र यावल यांनी उपस्थित राहून सभेला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले.

सभेचे सूत्रसंचालन विजय वरटकर साधन व्यक्ती यांनी केले व आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख विजय ठाकूर यांनी केले. कार्यशाळेच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com