एसटीची वाहतूक पूर्ववत

एसटीची वाहतूक पूर्ववत

डेपोतून 150 तर बाहेरगावाहून येजा करतात 350 बसेस

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या शहरातील आगाराची रोजची वाहतूक आता 80 टक्के पूर्ववत होत असून रोज जळगाव आगारातून 150 बसेस तर बाहेरील विविध ठिकाणच्या आगारातून 350 बसेस जळगाव स्थानकावर ये जा करतात अशी माहिती एसटीच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली.

कोरोनारुपी मोठा धक्का तब्बल 5 महिने एस.टी.ची चाके जागच्या जागी थांबली अन कधी न भरुन निघणारे नुकसान एसटी महामंडळाला पर्यायाने जळगाव आगारालाही कोरोनाच्या महामारीमुळे सोसावे लागले. 20 ऑगस्ट पासून एस टी जागेवरुन हलली खरी मात्र त्यानंतर किमान 15 दिवस तरी राज्यातले एसटी आगार या धक्क्यातून बाहेर आले नाही. आता खरी रेलचेल ही नवरात्र, दसरा सणापासून आली. एस टी ची गजबज ही नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून वाढायला लागली आणि नागरिकानी सुटकेचा नि:श्वास सोडला.

50 टक्के टार्गेट कव्हर

मागील वेळ्च्या दिवाळीपेक्षा यंदा मात्र उत्पन्नावर परिणाम होणार आहे. दिवाळी यंदा 1 महिना उशीराने असल्याने याचाही फटका तसेच कोरोनाचा फटका यामुळे एस टी आगाराला आपले गतवेळचे उद्दीष्ट गाठता आले नाही. साहजिकच उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आताशी कुठे कोरोनाचे भय संपल्यागत आहे. मात्र नागरिक रात्रीच्या बसेसना अजूनही गर्दी करीत सल्याचे व बाहेर निघत नसल्याचे चित्र आहे. आताशी 50 टक्के उत्पन्न कव्हर होत आहे.

पूर्ण क्षमतेने बसेस सुरू 1 नोव्हेंबर पासून राज्यात पूर्ण क्षमतेने बसेस सुरू झाल्या आहेत. पर्यायाने 80 टक्के वाहतूक पूर्ववत झाली आहे. दोनतीन दिवसात 100टक्के वाहतूक सुरळीत होईल असे चित्र आहे. रोज नागरिकांचा ओढा आता बसस्थानकांकडे वाढू लागला आहे. मोठी रेलचेल नागरिकांची गेल्या काही दिवसापासून वाढू लागली आहे. कर्मचारीही पूर्ण क्षमतेने हजर राहू लागले आहेत. मात्र कोरोनाच्या मोठा फटका हा बसलेला आहे. त्यातून सावरणे कठीण झाले आहे. आताशी कुठे गाडी रुळावर येवू लागली आहे.

सर्वच बसेस होणार सुरू

1 नोव्हेंबर पासून पूर्ण वाहतूक सुरळीत होण्याचे दृष्टीने पावले टाकली जात आहेत. विविध ठिकाणी मुक्कामी बसेस सोडल्या जात आहेत. तसेच खेडोपाडी जाणार्‍या सर्वच बसेस सोडल्या जात आहेत. तसेच लांब पल्ल्ल्याच्या जवळपास सर्वच बसेस सुरू झाल्या आहेत. सर्व यंत्रणा आता कशीबशी या कोरोनाच्या धक्क्यातून उभी राहत आहे. बाहेरील आगाराचेही या दृष्टीनेच प्रयत्न सुरू असून शेड्युल कव्हर करायला फारसा अवधी लागणार नसल्याचेही एसटीच्या निकटवर्तीय सूत्रांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com