सराफ बाजार ‘लॉक’ डाऊन

कोरोनाच्या प्रकोपामुळे गुढीपाडवा सणावर सावट
सराफ बाजार ‘लॉक’ डाऊन

जळगाव - Jalgaon

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील मार्केट आणि सराफा पेढ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दुसर्‍या वर्षीही गुढीपाडवा सणावर कोरोनाचे सावट असल्याने सराफा बाजारातील करोडोची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी सोने-चांदी व्यावसायिकांना यावर्षीय आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक दिवसागणिक वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाने गुढीपाडवा सणाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील सराफ बांधवांनी दुकाने बंद ठेवल्याने सुभाषचौकातील सराफा बाजारात शुकशुकाट दिसून आला.
ऑनलाइन खरेदीला प्रतिसाद नाही
गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जुन सोने-चांदी खरेदी परंपरा आहे. मात्र, कोरोनामुळे शासनाने काही निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागल्यामुळे व्यापार्‍यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अमलात आणले आहेत. मात्र, सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने ऑनलाइन सोने खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी व्यापार्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोट्यवधी रुपयांचा बसला व्यापार्‍यांना फटका
गेल्या वर्षभरात सण-उत्सवात सोने-चांदी खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफा बाजाराला साधता आलेली नाही. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची व्यापार्‍यांना आशा होती. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने सोने-चांदी खरेदीची उलाढाल ठप्प असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितलेशहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक दिवसागणिक वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाने  गुढीपाडवा सणाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावली तयार करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील सराफ बांधवांनी दुकाने बंद  ठेवल्याने सुभाषचौकातील सराफा बाजारात शुकशुकाट दिसून आला.

ऑनलाइन खरेदीला प्रतिसाद नाही
गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जुन सोने-चांदी खरेदी परंपरा आहे.  मात्र, कोरोनामुळे शासनाने काही निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागल्यामुळे व्यापार्‍यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अमलात आणले आहेत. मात्र, सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने ऑनलाइन सोने खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी व्यापार्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोट्यवधी रुपयांचा बसला व्यापार्‍यांना फटका
गेल्या वर्षभरात सण-उत्सवात सोने-चांदी खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफा बाजाराला साधता आलेली नाही. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची व्यापार्‍यांना आशा होती. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने सोने-चांदी खरेदीची उलाढाल ठप्प असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले

गुढीपाडव्यानिमित्त सुवर्ण बाजार सुरु रहायला पाहीजे होता. मात्र शासनाच्या निर्बंधामुळे सराफ बाजार बंद ठेवला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणार्‍या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. या वर्षी सुवर्ण खरेदीचा खंड पडल्याची भावना सर्वसामान्य ग्राहकांमध्ये आहे.
अजय ललवाणी, अध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन, जळगावगुढीपाडव्यानिमित्त सुवर्ण बाजार सुरु रहायला पाहीजे होता. मात्र शासनाच्या निर्बंधामुळे सराफ बाजार बंद ठेवला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणार्‍या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. या वर्षी सुवर्ण खरेदीचा खंड पडल्याची भावना सर्वसामान्य ग्राहकांमध्ये आहे.

अजय ललवाणी, अध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन, जळगाव

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com