जळगाव, बुलढाण्यात का झाली बीएसएनएलची सेवा ठप्प ?

जळगाव, बुलढाण्यात का झाली बीएसएनएलची सेवा ठप्प ?

मोबाईल व इंटरनेट वापरकर्त्यांना मनस्ताप

भुसावळ प्रतिनिधी Bhusawal

जळगाव औरंगाबाद दरम्यान बीएसएनएलची मीडिया केबल खंडित झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील काही भागातील बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी बारा वाजे नंतर जळगाव -पारोळा, पारोळा- धुळे व धुळे -औरंगाबाद दरम्यानच्या बीएसएनएल मुख्य केबलची मिडीया केबल खंडित झाल्यामुळे जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील बीएसएनएल मोबाईल सेवा व इंटरनेट सेवा दुपारी साडेचार वाजेपर्यंत सुरळीत झालेली नव्हती. बीएसएनएलच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला दरम्यान याबाबत बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचेही मोबाईल क्रमांक बीएसएनएलच्या असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही मात्र भुसावळ येथील बीएसएनएल कार्यालयातून या विधानाबाबत दुजोरा देण्यात आला आहे.

दरम्यान जळगाव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला असता केबलच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून सायंकाळपर्यंत बीएसएनएलची सेवा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.

सध्या करणाच्या भयावह परिस्थिती उत्तररात्र मोबाईलचा वापर इंटरनेटचा वापर होत असताना अचानक बीएसएनएलची सेवा खंडित झाल्यामुळे मोबाइल धारकांचा इंटरनेट वापरकर्त्यांची ही गैरसोय झाली आहे त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com