रक्षाबंधनासाठी आलेल्या भावाचा अपघातात मृत्यू
जळगाव

रक्षाबंधनासाठी आलेल्या भावाचा अपघातात मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतणार्‍या रत्नापिंप्री येथील तरुणाच्या मोटारसायकलला मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास विद्यापीठासमोरील महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तरुणाचा मृत्यू झाला.

पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील अजय युवराज मनोरे (वय 40) हा तरुण दोन दिवसांपूर्वी जळगावातील अयोध्यानगरात काकाच्या घरी आला होता. त्यास चुलत बहिणीने राखी बांधून औक्षण केले.रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तो मंगळवारी दुपारी रत्नापिंप्री येथील घरी जाण्यासाठी मोटारसायकलने निघाला.

मात्र, विद्यापीठासमोरील महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. यात तो गंंभीर जखमी झाला. महामार्गाने ये-जा करणारे काही वाहनचालक घटनास्थळी थांबले. त्यांनी अजय जवळील मोबाइलमधील एका नंबरवर संपर्क साधला. तो नंबर अजयचा मोठा भाऊ सचिनचा होता. त्यास या अपघाताची माहिती देण्यात आली. तसेच काही नागरिकांनी घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावली.

अजयला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाळधी दूरक्षेत्रात रात्री उशिरापर्यंंत अपघाताबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com