जळगाव

चाळीसगावात लाचखोर रोखपाल गजाआड

Balvant Gaikwad

नगरपरिषदकडे असलेले फर्निचरचे एक बिल काढून दिल्याचे मोबदल्यात व फर्निचरचे कामासाठी नगरपरिषदकडे जमा असलेली डिपॉजीट रक्कम परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात चाळीसगाव नगरपरिषदेच्या रोखपालास तीन हजारांची लाच स्विकारातांना नाशिक एलसीबी पथकाने रगेहात पकडले. हि घटना दि.26 रोजी संकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला असून संदीप पंडितराव खैरनार याला अटक करण्यात आले आहे.

चाळीसगाव येथील तक्रारदार याचे नगरपरिषदकडे जमा असलेले फर्निचरचे एक बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात व फर्निचरचे कामासाठी डिपॉजीट रक्कम परत मिळवून देण्याचे मोबदल्यात आरोपी संदीप पंडितराव खैरनार (वय 52) रा.चाळीसगाव यांनी दि.17 रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. यासंबंधी तक्रारदार याने नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधुन तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीरीची पडताळणी केल्यानतंर त्यात तथ्य आढळल्याने दि.26 रोजी, नाशिक एलसीबीच्या पथकाने येथील न.पा.च्या आवारात यशस्वी सापळा लावला असता, रोखपाल संदिप खैरनार यांना तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. हि कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल कडासने नाशिक, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर कारभारी निकम, पोलीस निरीक्षक चंद्रसेन बापूराव पालकर, पो.हवा.राजेंद्र डांगे, पो.ना.नितीन कराड, पो.ना.वैभव देशमुख, पो.ना.प्रवीण महाजन, चा.पो.हवा.विनोद पवार, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक आदिनी केली आहे.

न.पा.च्या शंभर वर्षांच्या इतिहासात काळीमा फासणारी घटना-

चाळीसगाव नगर परिषदेतचा नुकताच सुवर्ण मोहत्सव साजरा करण्यात आला. गेल्या शंभर वर्षात न.पा.त एकदाही एलसीबीच्या कारवाईची घटना घडली नाही. त्यामुळे नगरपरिषदेला या घटनेमुळे ‘ लाचेचा ’ डाग पहिल्यादाच लागल्यामुळे न.पा.ची प्रतिमा मलीण झाली असून न.पा.च्या इतिहासात ही काळीमा फासणारी घटना आहे. परंतू यामागे राजकिय व्देष असल्याच्या देखील चर्चा असून तक्रारदार हा धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ चारित्र्यवान नसून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत. तसेच तो ‘ एका ’ राजकिय पुढार्‍याचा खास पंन्टर असल्यामुळे राजकिय व्देषापोटी हा सापळा घडवून आनल्याच्या देखील चर्चा न.पा.च्या कर्मचार्‍यांमध्ये काल दिवसभर होत्या. त्यामुळे आता खरे काय आणि खोटे काय हे एलसीबीच्या तपासात समोर येणारच आहे.

Deshdoot
www.deshdoot.com