...तर ‘ब्रेक द चेन’ कशी होणार ?

10 दुकानांना सील; मनपा उपायुक्त संतोष वाहुळेंची कारवाई
...तर ‘ब्रेक द चेन’ कशी होणार ?

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने ब्रेक द चेनसाठी कडक निर्बंध लागू केले असून 15 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

मात्र या वेळी देखील शहरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जर अशी गर्दी केली तर ब्रेक द चेन कशी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, निर्धारित वेळेपेक्षा सुरु असणार्‍या आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या 11 दुकानांवर उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सीलची कारवाई केली आहे.

करोनाच्या दुसरी लाट अधिक तीव्र आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जिल्ह्यासह राज्याला वेढले आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने अधिक कडक निर्बंध लागू केले आहे.

त्यामुळे कुठेतरी बाधितांच्या संख्येत घसरण होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसताहेत. अनेक तज्ज्ञांकडून मे महिन्याच्या अखेरीस करोनावर नियंक्षण मिळवणे शक्य असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे गर्दी करु नये असे वारंवार आवाहन केले जात असतांना पुन्हा गर्दी पाहायला मिळतेय.तर मग कोरोनाची कशी साखळी तुटेल.याचा विचार नागरिकांनी करायला पाहिजे. मात्र गर्दी कायम आहे. मंगळवारी सकाळी दाणाबाजारासह बळीरामपेठ,सुभा, चौकात तोबा गर्दी पाहायला मिळाली.

व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन

राज्यशासनाने कडक निर्बंध लागू करुन अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक वस्तुंसाठी सकाळी 11 वाजेपर्यंची वेळ निश्चित केली आहे.

मात्र काही व्यावसायिकांकडून लपुन-छपून व्यवसाय केला जात आहे. दरम्यान, उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पथकाने बळीरामपेठ, सुभाष चौक, भाटीया मार्केट या ठिकाणी पाहणी केली असता, नियमांचे उल्लंघन करणार्‍या 11 व्यावसायिकांचे दुकाने सील केली आहेत.

यांच्यावर केली कारवाई

नियमांचे उल्लंघन करणार्‍या बळीराम पेठेतील बजाज ट्रेडर्स, बालाजी सन्स्, अरिहंत कटलरी सेंटर, मेमसाब जनरल, भाटीया मार्केटमधील जय वैष्णवी, बोहरा मसजिद कॉम्प्लेक्स मधील ब्रँडेड जीन्स्, जेएमसी मार्केटमधील वाहेगुरु इलेक्ट्रीकल्स्, बीएच प्लाझा मधील नंदूरबार सराफ, गजानन प्लाझा मधील नागदेव इंटरप्रायजेस व शिव होजिअरी या दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com