दरेगाव येथे कॉलमच्या खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू
जळगाव

दरेगाव येथे कॉलमच्या खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू

खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात

Manohar Kandekar

चाळीसगाव - प्रतिनिधी Chalisgaon

तालुक्यातील दरेगाव-लोंढे महामार्गाचे काम सुरु आहे, महामार्गावरील पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या कॉलमच्या खड्ड्याचा रात्रीच्या सुमारास अंदाज न आल्यामुळे मोटारसायंकलसह दोघोचा पडून जागीचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान घडली. दोघे मयत हे लेडाणे, ता.मालेगाव,जि.नाशिक येथील आहे. हिरालाल पुनजाराम आहिर व बालु भिला जगताप अशी मयताची नावे आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

शेतीसाठी औषधे घेण्यासाठी शेतकरी हिरालाल पुनजाराम आहिरे (५४) व बालु भिला जगताप (३८) हे दोघे मोटारसायकल (एमएच ४१, झेड ४६३९) वरुन चाळीसगावकडे येते असताना, तालुक्यातील दरेगाव-लोंढे येथे महामार्गाच्या (बहाळ मार्ग) कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने, दोघेही मोटारसायंकलसह कॉलमच्या खड्डात पडले. दोघांनाही जबर मार लागल्यामुळे व रात्रीच्या सुमारास कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

सकाळी ग्रामस्थाना दोघेही मयत अवस्थेत खड्ड्यात पडल्याचे दिसल्यानतंर त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस पाटील सागर पाटील यांना दिली. सागर पाटील यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानतंर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी पंचनामा करुन दोघांचे ही मृतदेह ग्रामीण पोलीस स्टेशनला पोस्टमार्टमसाठी रवाना केले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Deshdoot
www.deshdoot.com