नवीन बी.जे.मार्केट परिसरात वृध्द महिलेचा मृतदेह आढळला

नवीन बी.जे.मार्केट परिसरात वृध्द महिलेचा मृतदेह आढळला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

नवीन बी.जे. मार्केट परिसरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या समोर एका अनोळखी 60 ते 65 वर्षीय वयोवृध्द महिलेचा मृतदेह आज शनिवारी सकाळी 8 वाजता आढळून आला आहे.

याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

शहरातील नविन बी.जे. मार्केट परिसरातील इंडीयन रेडक्रॉस सोसायटीसमोर एका 60 ते 65 वर्षीय वयोवृध्द महिला आज शनिवार 17 जुलै रोजी सकाळी 8 वाजता मयतस्थितीत आढळून आला.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कर्मचारी यांना मयतस्थितीत आढळून आल्याने त्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील आणि पो.ना. संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे. जिल्हा पेठ पोलीसांनी मयत वृध्द महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com