बोदवड - Bodwad - प्रतिनिधी :

येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील हनुमान घाटीजवळ भरधाव वेगाने येणार्या ट्रकने एका अनोळखी इसमाला चिरडल्याने तो जागीच ठार झाला आहे.

सदरील गुन्हा तानाजी पाटील (रा.आनंद नगर, बोदवड) यांच्या फिर्यादीवरुन वाहनचालक हरेंद्रसिंग लाखनसिंग (रा.महापूर, ता.जि.भिंड, राज्य-मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने आरोपीला नाडगाव रेल्वे गेट जवळून अटक करण्यात आली.

बोदवड ते नाडगाव रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे चिन्ह दिसत नसून गेल्या सहा महिन्यांत अपघातामूळे आतापर्यंत दोन व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहे.

दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास बोदवड ते नाडगाव रोडवरील हनुमान घाटी जवळील प्रतिक जावळे यांच्या शेताजवळ एमपी 07 एचबी 9169 असा वाहन क्रमांक असलेल्या भरधाव ट्रकने धडक देऊन तो मागच्या चाकाखाली आल्याने त्याच्या डोक्याचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला.

वाहन न थांबता पसार झाले .पोलिस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने आरोपीला नाडगाव रेल्वे गेट जवळून अटक करण्यात आली.

एमपी 07 एचबी 9169 या क्रमांकाचे वाहन पोलिस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. वाहन चालकावर भा.दं.वि. 304 अ, 279, 338 मोटरवाहन कायदा कलम 184, 134 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अनोळखी मयत इसमाचे वय अंदाजे 45 ते 50 वयोगटातील पुरुष असून त्याने अंगात गुलाबी रंगाचे शर्ट व काळ्या रंगाची पँट घातलेली आहे. गुन्ह्याचा तपास पोना गजानन काळे करीत आहे.