जळगाव : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

जळगाव : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

महामार्गावरील वाहतुक ठप्प

जळगाव - Jalgaon

ओबीसी (OBC Reservation) समाजाचे राजकीय आरक्षण राज्यसरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे (BJP) शनिवारी सकाळी १२ वाजता जळगाव आकाशवाणी चौकात भाजपा पदाधिकार्‍यांनी ‘ओबीसी के सन्मान में भाजप मैदान में’ यासह विविध घोषणाबाजी करीत चक्काजाम आंदोलन केले.

भाजपा नेते तथा आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष (Mla Suresh Bhole) अमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे,जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते.

भुसावळकडे जाणारी व एरंडोलकडे जाणारी वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती. पोलिसांनी भाजप पदाधिकार्‍यांना अटक करुन नंतर सुटका करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com