भाजपाने खडसे कुटुंबियांचा छळ थांबवावा

अन्यथा रस्त्यावर उतरु : खडसे समर्थकांचा इशारा
भाजपाने खडसे कुटुंबियांचा छळ थांबवावा

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

भाजपाकडून (Bjp) माजी मंत्री एकनाथराव खडसे ( Eknathrao Khadse) व कुटुंबीयांविरुद्ध कुरघोडी करुन (ED) ईडीची चौकशी लावून त्रास दिला जात आहे. राज्यात खडसेंना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यांची राजकीय व समाजिक ताकद मोठी असल्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळु सरकत असल्याने ते केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन ईडीच्या कारवाईने कुटुंबाचा मानसीक छळ करीत आहे. हा प्रकार भाजापाने वेळीच न थांबविल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा खडसे समर्थकांनी तहसीलदार दीपक धिवरे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

या निवेदनावर नगरसेवक प्रा. सुनील नवे, प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, देवेंद्र वाणी, नगरसेवक किरण कोलते, किशोर पाटील, गणेश किनगे, नगरसेवक अमोल इंगळे, ऍड. बोधवराज चौधरी, अनिकेत पाटील, माजी नगरसेवक वसंत पाटील, रमाकांत (बापू) महाजन, मुकेश गुंजाळ, पृथ्वीराज पाटील, सागर जाधव, कोमल चौधरी, रत्नेश चौधरी, श्याम भारंबे, कल्पेश पाटील, विनय चौधरी, सुमित बर्‍हाटे, प्रशांत अहिरे, संदेश सुरवाडे, एजाज खान, उस्मान खान, नगरसेवक मुकेश पाटील आदींच्या निवेदनावर स्वक्षर्‍या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com