ओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

ओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जळगाव - Jalgaon

ओबीसी आरक्षण (OBC reservation) मिळावे या मागणीसाठी बुधवारी भाजप ओबीसी मोर्चा (BJP OBC front) तसेच जळगाव महानगर व जळगाव ग्रामीणतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector's Office) जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसेच मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन (Upper Collector Praveen Mahajan) यांना देण्यात आले.

महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात महानगर सरचिटणीस विशालभाऊ त्रिपाठी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ उज्वला ताई बेंडाळे, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष रेखा पाटील, महिला मोर्चाच्या दिप्ती चिरमाडे,महिला सरचिटणीस रेखा वर्मा, क्रीडा आघाडीचे अरुण श्रीखंडे, ओबीसी उपध्यक्ष तृप्ती ताई पाटील, चंदु महाले, विजय बारी, शांताराम गावंडे, अमित देशपांडे ,युवा मोर्चाचे शुभम बावा, युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलींद चौधरी, जितेंद्र चौथे, सचिन बाविस्कर, प्रथम पाटील, रितेश सोनवणे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com