चाळीसगाव : भाजपातर्फे आणीबाणीमध्येे जेलमध्ये जाणार्‍यांचा सन्मान

चाळीसगाव : भाजपातर्फे आणीबाणीमध्येे जेलमध्ये जाणार्‍यांचा सन्मान

भाजपा युवा मोर्चाने केला सन्मान

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

आणीबाणीच्या काळात जेलमध्ये जाणार्‍या योद्ध्यांचा (Bharatiya Janata Yuva Morcha) भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आज सन्मान करण्यात आला. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी या भारत देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावली, या आणीबाणी खाली शेकडो राजकीय नेत्यांना काहीही कारण नसताना अटकेत जावं लागल होते. अशांचा सन्मान भाजपा युवा मोर्चातर्फे सन्मान करण्यात आला.

आणीबाणी विरोधातील लढाईत जेल भोगणार्‍या चाळीसगाव तालुक्यातील संघर्ष योद्धे यांचा सत्कार समारंभ आज (दि.२५) सकाळी १० वाजता आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या जनसेवा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

चाळीसगाव तालुक्यातील आणीबाणी काळात जेल मध्ये जाणारे १३ तर सत्याग्रही म्हणून काम करणार्‍या १४ जणांचा सहभाग होता. या सर्व योद्ध्यांपैकी आज रोजी हयात असलेल्या चार व बाकी योद्ध्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आ.मंगेश चव्हाण, बाबासाहेब चंद्रात्रे, (Kisan Morcha) किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते यु.डी.माळी, भाजयुमो तालुकाध्यक्ष सुनिल पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, गिरीशजी बर्‍हाटे, अमोल नानकर, अमोल चव्हाण, योगेश खंडेलवाल, शिवदास महाजन, भास्कर पाटील, फकिरा मिर्झा, प्रा.सचिनजी दायमा यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com