<p><strong>रावेर|प्रतिनिधी Raver</strong></p><p>रविवारी सायंकाळी झालेल्या वादळाने केळी,गहू,हरभरा,मका पिकांचे नुकसान झालेले आहे.मळणीकरिता गहू आणि हरभरा कापणी झालेल्या क्षेत्रावर पाऊस झाल्याने,शेतमाल भिजून नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे व्हावीत अशी मागणी रावेर येथे भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.</p>.<p> याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुने यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.त्यात पंचनामे करण्याची मागणी केली आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,तालुका अध्यक्ष राजन लासुकर,शहराध्यक्ष दिलीप पाटील,मनोज श्रावक,राजेंद्र शहाणे,भाजप युवा मोर्च्या अध्यक्ष महेंद्र पाटील,सुधाकर पारधी,वसंत महाजन,परमेश्वर सोनार,निलेश सावळे,अजिंक्य वाणी उपस्थित होते.</p>