मुक्ताईनगर -वार्ताहर - Muktainagar

अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतमध्ये बीजेपी सेना यांनी फिफ्टी-फिफ्टी यश संपादन केले. तर शिवसेनेने मुसंडी मारली आहे. एक अपक्ष महिला उमेदवार या एकनाथराव खडसे यांना मांडणाऱ्या असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान भाजपा तसेच शिवसेना राष्ट्रवादी यांनीसुद्धा आपल्या वर्चस्वाचा दावा केला आहे.भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एड. रोहिनी खडसे यांनी उर्वरित सहा जागांवर दावा केलेला असल्याने कोथळी ग्रामपंचायत मध्ये खडसे परिवाराचे वर्चस्व दिसून येत असले तरी शिवसेनेने घेतलेली आघाडी ही मात्र वाखाणण्यासारखी आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत ही माजी महसूल मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे मूळ गाव असून खासदार रक्षा खडसे देखील कोथळी येथेच राहतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. कोथळी ग्रामपंचायत मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कायम होते. मागील निवडणुकीत सरपंच पद शिवसेनेने केलेले असले तरी उर्वरित जागांवर भारतीय जनता पक्षाचे अर्थातच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे उमेदवार निवडून आलेले होते. म्हणजेच भाजपाचे वर्चस्व होते.

विद्यमान निवडणुकीत मात्र शिवसेनेने जोरदार मुसंडी घेत केवळ सहा जागा उभा केलेल्या होत्या.त्यापैकी पाच जागा निवडून आणलेल्या आहेत. त्यात पॅनल प्रमुख पंकज अशोक राणे याच्यासह सह योगेश राणे, मोहन रमेश कोळी ,ताराबाई प्रल्हाद भिल्ल, शितल संदीप विटकर, यांचा विजय झाला असून खडसे परिवारावर प्रेम करणाऱ्या उमेदवारांमधून उमेश सुभाष राणे, अनुराधा योगेश चौधरी, मिराबाई शामराव पाटील, नारायण नामदेव चौधरी, राखी गणेश राणे यांचा विजय झालेला आहे. यापूर्वीच एक जागा जी वंदना विजय चौधरी यांची बिनविरोध झालेली आहे, तीदेखील खडसे परिवाराशी संलग्न असलेली जागा आहे .त्यामुळे कोथळी ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा विजय मानला जात असला तरी शिवसेनेची मुसंडी विशेष मानली जात आहे.

दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी खडसे परिवारावर प्रेम करणारे हे उमेदवार असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर एड.रोहीणीताई खडसे खेवलकर यांनी नाथाभाऊ मानणारे सहा विजयी उमेदवार आहेत असल्याचा दावा केल्याने नेमकी ग्रामपंचायत कुणाची ? याबाबत संभ्रम कायम ठेवला आहे. एकनाथराव खडसे यांना मानणाऱ्या उमेदवारांचा विजय झाला आहे.