अल्पवयीन दुचाकी चोर एलसीबीच्या जाळ्यात

खामगाव व कल्याण येथे गुन्हे दाखल
अल्पवयीन दुचाकी चोर एलसीबीच्या जाळ्यात
आरोपीकडून जप्त केलेल्या दुचाकीभुसावळ

भुसावळ - प्रतिनिधी- Bhusawal

खामगाव व कल्याण येथून दोन मोटारसायकली चोरणार्‍या येथील मुस्लीम कॉलनीतील अल्पवयीन ईराणी मोटारसायकल चोरास एलसीबीच्या पथकाने शोधुन त्याला पकडून संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी सीआरपीसी ४१(अ)प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७० हजार रू.किमतीची तर खडकपाडा (कल्याण) पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८० हजार रू.किमतीची अशा १ लाख ५० हजार रूपयांच्या दोन दोन काळ्या व लाल रंगाच्या पल्सर गाड्या चोरून नेल्याचे दोन गुन्हे दाखल होते ते आता उघडकीस आले. अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई एलसीबीचे पो.नि. बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील एएसआय अशोक महाजन, पोहेकॉं. शरीफोद्दीन काझी, सूरज पाटील, पो.ना. युनूस शेख, पो.ना. किशोर राठोड, पो. ना. अरूण राजपूत, पो. कॉं.रणजीत जाधव यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com