भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal -

शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज परिसरातील जयपाल. जी. नागराणी यांच्या देशी दारु दुकानास जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारणे दाखवा नोटीस बाजावत सील ठोकल्याची कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यउत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने शहरातील दारु दुकानांची तपासणी केली होती. यात येथील जे.जी. नागराणी यांच्या देशी दारु दुकानाचीही तपासणी करण्यात आली होती. त्यात त्रृटी आढळून आल्याने राज्यस्तरीय पथकाने एमआरपीसीची केस नोंदविली होती.

याबाबतचा अहवाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सादर करण्यात आला होता. याबाबत २९ रोजी दुकान सील करण्याचे आदेश जिल्हाधिकर्यांनी दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन विभागाचे विभागीय निरीक्षक ईश्वर वाघ यांनी पथकासह नागराणी यांच्या (कांबडी बार) दुकानात दाखल होत. सील केल्याची कारवाई केली. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत हे सील काय राहणार आहे.

दरम्यान, दुकान सील करण्यात आले आहे. एमआरपीसीची कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. याबाबतची सुनावणी होईल त्यावेळी सदर नोटीसीला उत्तर देण्यात येईल अशी माहिती येथील अशोक नागराणी यांनी दिली.