वाघुर धरण,संग्रहित
वाघुर धरण,संग्रहित
जळगाव

वाघुर धरण ९० टक्के भरले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ashish Patil

Ashish Patil

सुनसगाव - ता. भुसावळ - वार्ताहर Bhusawal :

येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील वाघुर धरण दि ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ८८.१२ टक्के भरले होते आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पाऊस झाल्याने धरण ९० टक्के च्या जवळपास भरले आहे.

त्यामुळे वाघुर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाघुर धरण शासनाने जा क्र / वाधवि / रेशा /२१६३ /२०२० वाघुर धरण विभाग जळगाव दि ४ आॅगष्ट २०२० या परिपत्रका व्दारे निमगाव ,बेळी , जळगाव खुर्द खिर्डी , तिघ्रे,कडगाव (ता जळगाव ), बेलव्हाळ , सुनसगाव ,गोंभी , साकेगाव ( ता भुसावळ ) या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून सरपंच व ग्रामसेवक ,पोलीस पाटील यांना कळविण्यात आले असून या गावांमध्ये दवंडी देण्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच वाघुर धरण प्रशासनाने प्रांताधिकारी , तहसीलदार , पाटबंधारे विभाग ,व सरपंच , ग्रामसेवक , पोलीस पाटील यांना कळवीले असून वाघुर नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com