कठडे तोडून पलटी झालेला ट्रक
कठडे तोडून पलटी झालेला ट्रक
जळगाव

फेकरी उड्डाण पुलावरुन ट्रक कोसळला

Ashish Patil

Ashish Patil

फेकरी - Bhusawal - भुसावळ - वार्ताहर :

येथील राष्ट्रीय महमार्गार्वावरील रेल्वे उड्डाण पुलावरुन मुंबई येथून रायपुर (मध्य प्रदेश) कडे छर्रे घेउन जाणारा २२ चाकी ट्रक खाली कोसळल्यामुळे मोठ्या अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून रायपुरकडे लोखंडी छर्रे घेऊन जाणारा २२ चाकी ट्रक क्र. सीजी ०४ एच.पी.९४०१ हा सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फेकरी उड्डाण पुलावरुन जात असतांना चालक संतोष (पूर्ण नाव माहित नाही) (वय ३२, रा. दिलाई, जाजविर) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात गाडीचा क्लिनर जितेंद्र कुमार ढारिया (वय ३०, रा. दिलाई जाजवीर) याच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक व क्लिनर यांना ट्रकमधून बाहेर काढून उपचारासाठी तात्काळ भुसावळ येथे रवाना केले. या अपघातामुळे पुलाच्या संरक्षक कठड्याचे व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दोन तास वाहतूक ठप्प- पोलिस कर्मचारी घटनास्थळी उशिरा दाखल झाल्यामुळे दोन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. घटनास्थळी दाखल झालेले तालुका पो.स्टे.चे पो.नि. रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी घटनास्थळी माहिती घेऊन वाहतुक सुरळीत केली. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com