मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
जळगाव

मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

८० हजारांचा मुद्देमाल जप्त : बाजारपेठ पोलिसांची कारवाई

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - Bhusawal :

शहरातून मोटरसायकल चोरी प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चक्रे फिरवत चोरट्याला काही तासात दोन मोटरसायकल व मोबाईलसह ताब्यात घेतल्याची कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत बाजारपेठ पोलिसात ४ रोजी पहाटे गु.र.नं. ७६२/२०२० भा.दं.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पो.नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी समाधान गोकुळ सपकाळे (वय २८, रा. कोळीवाडा, गाव फुकणी ता. जिल्हा जळगाव. ह मु. तुकाई दर्शन हडपसर जिल्हा पुणे) यास ४ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

त्यास सदर गुन्ह्यात विचारपूस केली असता त्याने पोलीस कस्टडी दरम्यान त्याने गुन्ह्यातील मोटरसायकल सह अन्य दोन व मोबाईल काढून दिला. त्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी ३५ हजार रुपयांची हिरो पॅशन प्रो मोटारसायकल, ३० हजार रुपयांची होंडा ड्रीम युगा कंपनीची मोटार सायकल, १५ हजार रुपयांचा मोबाईल असा ऐकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई डिवायएसपी गजानन राठोड, पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, हे.कॉं. सुनील जोशी, पो. ना. रमण सुरळकर, रविंद्र बिर्‍हाडे, उमाकांत पाटील, किशोर महाजन, समाधान पाटील, पो. कॉ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चालक हे.कॉं. अशोक पाटील यांनी केली.तपास हे.कॉं. सुनील जोशी करीत आहे. हा आरोपी सराईत मोटारसायकल चोर असून त्यावर जळगाव शहर पो.स्टे ला दोन व हडपसर पुणे पोलिसात चार गुन्हे दाखल आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com