करमाळा येथे कारवाई करतांना पोलिस निरीक्षक रामक्रुष्ण कुंभार
करमाळा येथे कारवाई करतांना पोलिस निरीक्षक रामक्रुष्ण कुंभार
जळगाव

शिवपुर कन्हाळा शिवारात दारू भट्टी उध्वस्त

४७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

तालुक्यातील शिवपुर कन्हाळा शिवारात गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून तालुका पोलीसांच्या पथकाने छापा टाकला.

यात हीरू बुध्दू गवळी (कन्हाळा) हा गावठी दारुच्या भट्टीवर दारू गाळताना व दारू गाळण्याचे पक्के,कच्चे रसायनाचे ७ पत्री टाक्यांमध्ये १ हजार ३०० लिटर ३९ हजार रूपयांचे रसायनासह गावठी हात भट्टी ६० लिटर तयार दारू असा एकुण ४७ हजार ९०० रु.किमतीचे ऐवजसह ताब्यात घेतले.

या प्रकरणी तालुका पोलिसात ३२८, २७०, १८८ सह प्रोव्ही, आपत्ती व्यवस्थापन तसेच साथ रोग अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई डिवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि.अमोल पवार, हेकॉ.विठ्ठल फुसे, युनूस ईब्राहिम शेख, अजय माळी, पोकॉ. प्रदीप इंगळे, पोलीस चालक यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com