लॉकडाऊनमध्ये रेल्वेचे उत्पन्न २०० कोटींवर

डिआरएम विवेककुमार गुप्ता यांची माहिती : हॉल्टीकल्चर ट्रेन सध्या नाहीच
आँनलाईन पत्रकार परिषदेत उपस्थित डिआरएम विवेक कुमार गुप्ता सोबत अधिकारी
आँनलाईन पत्रकार परिषदेत उपस्थित डिआरएम विवेक कुमार गुप्ता सोबत अधिकारीभुसावळ

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

रेल्वेने आर्थिक उत्पन्नाल फारसे महत्व दिलले नाही. तर राष्ट्रीय आपत्तीत सहभागी होण्यासाठी प्राधान्य दिले आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांची सुविधा व जिवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी विशेष पार्सल व नुकतेच किसान विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या आहे.

नाशिक-पुणे महारेल प्रकल्प २३५ कि.मी. चा आहे. या बडल लाईन प्रकल्पाचा खर्च १६ हजार कोटी रुपये आहेे. यात १४६८ हेक्टर क्षेत्र ऍक्वायर होणार आहे. या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याचा डिपीआर राज्य शासनाचा आहे. यात २०-२० टक्के भागीदारी राज्य व केंद्राची तर ६० टक्के महारेलची असणार आहे.

या काळात रेल्वेला पॅसेंजर गाड्यांमधून उत्पन्न मिळाले नसले तरी सुरु करण्यात आलेल्या या विशेष पार्सल व गाड्यांमधून मिळालेले उत्पन्न जवळपास २०० कोंटी इतके आहे. ते नियमित उत्पन्नाच्या तुलनेत ३० ते ४० कोटींनी अधिक असल्याची माहिती डिआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली.

मध्य रेल्वेच्या वतीने दि.२४ रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ विभागासाठी आयोजित पहिल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, वरिष्ठ मंडळ सिंग्नल अभियंता निशांत द्विवेदी, उप मुख्य अभियंता (निर्माण) श्री रोहित थावरे तर मुंबई येथून मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार उपस्थित होते.

ते म्हणाले की, येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४५७ कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहे. कोरोनाची भयावह स्थिती पाहता मध्य रेल्वेने कमीत कमी खर्चात अडगडीत पडलेल्या रेल्वे डब्यांमध्ये सुधारणा करुन ८८२ आयसोलेशन कोच तयार केले आहे. त्यातील २० कोच भुसावळ विभागात आहे.

सुदैवाने आतापर्यंत या आयसोलेशन कोचेसची आवश्यकता भासलेली नाही. येथील रेल्वे हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये ६४ बेडची व्यवस्था आहे. विभागातील अन्य स्थानकांवर अशी व्यवस्था नसली तरी शासनाच्या मदतीने इतर ठिकाणी उपचार सुरु आहेत. विभागातून किसान विशेष ट्रेन धावत आहेत.

शेतकर्‍यांकडून होणारी या विशेष गाडीची मागणी पाहता ती आता आठवड्यातून दोन दिवस चालवली जात आहे. मेल एक्सप्रेसच्या धर्तीवर ही फास्ट ट्रेन आहो. दरम्यान, हॉल्टीकल्चर ट्रेन चालविण्याबाबतचा प्रस्ताव सध्यातरी नसल्याचे डिआरएम गुप्ता यांनी सांगितले.

शहरात प्रस्तावित मेमू वर्कशेडचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती डिआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी दिली. वर्कशेडच्या कमासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर ती लांबली आहे. टेंडरिग झाल्यानंतर तात्काळा कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, देवळलाली पँसेजरचे लवकरच मेमू ट्रेन मध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे. लोकल ट्रेन नाशिक पर्यंत धावण्यासाठी इगतपुरी-कसारा घाड सेक्शन मध्ये लोकल ची चाचणी झालेली नाही. दरम्यान भुसावळ-देवळाली मेमू ट्रेन इगतपुरी पर्यंत धावणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्यांच्या इंधनाच्या रुपात होणार ७०-८० कोटी रुपयांचा खर्च वाचला आहे. दर विभागाचे दररोजचे उत्पन्न दोन कोटी होते.

शहरातील आराधना कॉलनीजवळी बोगद्याचे काम राज्य शासनाच्या अडचणींमुळे थांबले आहे. त्याला मंजुरी मिळताच बोगद्याचे काम पूर्ण होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com