भुसावळ : रेल्वेचे ५४ कर्मचारी सेवानिवृत्त

१४.३३ कोटी रुपये खात्यात वर्ग
भुसावळ : रेल्वेचे ५४ कर्मचारी सेवानिवृत्त
डीआरएम कार्यालय भुसावळ

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागातुन दि.३० रोजी ५४ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या खात्यात १४.३३ कोटी रुपये वर्ग करण्यात आले. या निमित्ताने रेल्वेतर्फे व्हर्च्युअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रम पार पडला.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान व्हर्च्युअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन बुरहानपुर, खंडवा, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव, बडनेरा, नाशिक आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिले.

तसेच ऑनलाईनद्वारे त्यांच्या खात्यामध्ये १४.३३ कोटीरुपये वर्ग करण्यात आले. रोड रुपयाची राशी तत्काळ वर्ग करण्यात आली.

सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना एडीआरएम मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित केले.

सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी तर आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बी. एस. रामटेके यांनी केले.यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक यांनी परिश्रम घेतले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com