कारच्या धडकेत दुचाकीस्वार भुसावळच्या रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू

नशिराबादजवळ महामार्गावर माऊली पेट्रोलपंपासमोर अपघात
कारच्या धडकेत दुचाकीस्वार भुसावळच्या रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू

जळगाव - Jalgaon

ज्वारी घेण्यासाठी जळगाव खुर्द येेथे जात असलेल्या रामा भादू शिरोळे वय ५७ रा. अष्टविनायक कॉलनी, भुसावळ यांच्या दुचाकीला भरधाव कारने दिलेल्या धडकेत शिरोळे यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावा जवळील माऊली पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामा शिरोळे हे रेल्वेत नोकरीला आहेत. आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरोळे हे भुसावळ येथून घरुन ज्वारी घेण्यासाठी दुचाकी क्र.एम.एच.१९ सी.एम.०७९३ ने जळगाव खुर्द येत होते. यादरम्यान नशिराबाद जवळील माऊली पेट्रोलपंपासमोर त्यांच्या दुचाकीला भुसावळकडे भरधाव जाणार्‍या कार क्र एम.एच.१९ बी.यू.८९८८ ने जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रामा शिरोळे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण हाके, किरण बाविस्कर संतोष केदार यांच्यासह अन्य सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली . शिरोळे यांच्याकडे असलेल्या रेल्वे विभागाच्या ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com