भुसावळ : पोदार स्कूलचा १२ वीचा निकाल शंभर टक्के
जळगाव

भुसावळ : पोदार स्कूलचा १२ वीचा निकाल शंभर टक्के

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ - Bhusawal

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या १२ वी.चा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.

शाळेतून विज्ञान शाखेतून राजेंद्र वारके (९४ टक्के) गुण मिळवून प्रथन, लकी दिनेश चंद्रा (९२ टक्के) द्वितीय तर साक्षी अनिल संगवारने (८८ टक्के) तृतीय क्रमांक पटकावला तर सिद्धांत चंद्रप्रकाश खंडारे (८७ टक्के), उज्ज्वल नाथ (८२), अभय अनिल सहानी (८२), श्रुती संजयराव भुयार (८१) गुण पटकाविले. वाणिज्य शाखेतून रिया रंजन सिंग (८९) प्रथम, द्वितीय कनक श्रीनिवास स्वामीने (८८), तृतीय आयुष राकेश मिश्रा (८१), वैभव वर्मा (७५.५०) गुण पटकाउन विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले.

यावर्षी शाळेत विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे प्रथमच वर्ष होते व त्यातही सुमारे पन्नास टक्के पेक्षा जास्त विद्यार्थांनी ७५ टक्के पेक्षा गुण प्राप्त केली तर सर्वेच विद्यार्थांनी ६० टक्केहून अधिक गुण पटकावले. पालकांचे सहयोग, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थांच्या अथक परिश्रमातून प्राप्त यशाबद्दल शाळेची व्यवस्थापन समिती, प्राचार्य विनयकुमार उपाध्याय, व्यवस्थापक रामदास कुलकर्णी, पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका मनीषा श्रुंगी, नीलम अग्रवाल, एस्तर विन्सिंट, अरुंधती पाटील, लक्ष्मी रथ, रेखा मुळे, जितेंद्र वाघमारे, जितेंद्र लोखंडे, प्रकाश दलाल यांनी त्यांचे कौतुक केले.

Deshdoot
www.deshdoot.com