तापी नदीत बुडून एकाचा मृत्यू

अकस्मात मृत्यूची नोंद
मयत गणेश सपकाळे
मयत गणेश सपकाळे

वरणगाव फॅक्टरी - भुसावळ - वार्ताहर - Bhusawal :

तालुक्यातील तापी नदी काठी असलेल्या सांवतर निंभोरा येथील युवक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सांवतरनिंभोरा येथील रहिवाशी गणेश ज्ञानेश्वर सपकाळे (वय ३०) हा तापी नदीवर पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अदांज न आल्याने बुडून मृत्यू झाला.

याबाबत वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com