भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी जप्त केलेला मद्य साठा
भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी जप्त केलेला मद्य साठा
जळगाव

अवैध दारू विक्री ; एकास अटक

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

शहरातील कृष्णा नगरसमोर साई डेअरीजवळ प्रमोद प्रकाश धांडे गैर कायदा विना परवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत २ हजार ४९६ रुपयांचा मद्य साठा जप्त करण्यात आल्याची कारवाई बाजारपेठ पोलिसांनी केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसा, पो. नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारेे डिवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना निलेश बाविस्कर, रविंद्र बिर्‍हाडे, महेश चौधरी, रमन सुरळकर, पो. कॉ. कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मुद्देमालासह प्रमोद धांडे (वय ३८, रा. कृष्णा नगर जामनेर रोड भुसावळ) यास ताब्यात घेतले.

त्याची अंगझती घेतली असता त्याच्या जवळून २हजार ४९६ रुपयांची देशी टँगो पंच कंपनीच्या ४८ बाटल्या मिळुन आल्या.त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात प्रोव्हीशन गु.र.नं. ७६५/२० महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम १९४९ क. ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.ना. निलेश बाविसकर करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com