भुसावळ प्रतिनिधी bhusawal

शहरातील कचरा संकलन करणारा ठेकेदार अनधिकृतपणे शहरालगतच्या खेडी शिवारात टाकण्यात येत आहे. मात्र परिसरात नागरी वस्ती वाढत असल्यामुळे नागरिकांना या कचर्याचा त्रास होत आहे.

कचरा डेपोसाठी तालुक्यातील गोजोरा रस्त्यावर कचरा संकलनासाठी पालिकेने जागा खरेदी केली आहे. त्या ठिकाणी कचरा टाकण्यात यावा अशी मागणी नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील कचरा संकलनासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने तालुक्यातील गोजोरा रोडवर जागा घेतली आहे. मात्र ठेकेदार व काही लोक स्वत:च्या आर्थिक फायदा घेत असून त्या ठिकाणी कचरा टाकण्या ऐवजी शहरानजीकच्या खेडी रोडवर कचरा टाकत आहे. या अनधिकृत कचरा संकलच डेपो परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी कचरा संकलन केंद्र गोजोरा येेथे स्थलांतरीत करण्यात यावा.अन्यथा नागरिकांना होणार्या त्रासाला प्रशासन जबाबदार राहीश असा ईशारा नगरसेवक ठाकुर यांनी पालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

याबाबत प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले आहे.या निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.