ग्रामपंचायतच्या पावती पुस्तकावर पोलिसांचा ताबा

शासनाच्या आदेशानुसार करवाई : तक्रार आल्यास कारवाई डीवायएसपींचे आश्‍वासन
ग्रामपंचायतच्या पावती पुस्तकावर पोलिसांचा ताबा
संग्रहित

भुसावळ - Bhusawal - आशिष पाटील :

राज्यात करोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासनाच्यावतीने ठिक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. मात्र तालुक्यतील कुर्‍हा (पानाचे) येथे ग्रा.पं. व पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांवर आळा बसत आहे. मात्र दंडाची रक्कम वसुल करतांना ग्रामपंचायतीचे वसुली पुस्तकच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुर्‍हा (पानाचे) कोविड -१९ बाबत शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, कुर्‍हा (पानाचे) येथिल तापसणी पथकडून कारवाई होत असतांना संबंधित दंडाची ग्रामपंचायतची पावती खुद्द पोलिसांकडूनच फाडली जात आहे. त्यामुळे ग्रा.पं.चे पावती पुस्तक पोलिसांनी हायजॅक केली की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नियम मोडणार्‍यांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. पावती पुस्तक पोलिसांच्या ताब्यात असण्याचा प्रश्‍न नाही. एखाद्या वेळी ग्रा.पं कर्मचारी उपस्थित नसतांना असे होऊ शकते. मात्र अन्य ग्रा.पं.च्या पावत्या या ठिकाणी फाडण्यात येत असल्यास. तशी तक्रार संबंधितांनी करावी निश्‍चित कारवाई करण्यात येईल.

सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, भुसावळ

गट विकास अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या पावत्यांनुसार आम्ही दंडात्मक कारवाईच्या पावत्या फाडत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस प्रशासनाने संयुक्तिक कारवाई करण्याचे शासकीय आदेश आहेत त्यानुसार तालुक्यात कारवाई करण्यात येत आहे.

रामकृष्ण कुंभार, पोनि तालुका पो.स्टे. भुसावळ

अन्य ग्रामपंचायतींच्या पावत्या

दरम्यान, या ठिकाणी कारवाई होत असतांना नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाईत अनेक वेळा कुर्‍हा (पानाचे) ऐवजी परिसरातील अन्य ग्रा.पं.च्या पावती बुकातून दंडाची रक्कम वसुल केली जात असल्याचा प्रकारही समोर येत आहे. मात्र कोरोनाच्या काळात उगाचच पोलिस किंवा प्रशासनाशी वाद नको म्हणून नियमांचे उल्लंघन करणारे ही खोलात शिरत नसल्याने पथकातील कर्मचार्‍यांना फावत असल्याचा प्रकार आहे.

शासकीय आदेशानुसार नुसार आमचे कर्मचारी पोलिस पथकाला मदत करत आहेत. ग्रा.पं.च्या कामानिमित्त त्यांना पोलिस पथकासोबत पूर्ण वेळ काम करणे शक्य नाही.

जीवन (जर्नादन) पाटील, सरपंच, कुर्‍हा (पानाचे)

टार्गेटसाठी पुस्तके बदलली

दरम्यान, तालुक्यातील काही ग्रामपंचातींच्या क्षेत्रात दंडाची पाहिजे तशी रक्कम वसुल होत नसल्यामुळे त्या भागातील पोलिस कर्मचार्‍यांकडून तेथील संबंधित ग्रा.पं.च्या पावती पुस्तकात कुर्‍हा येथून दंडाची पावती फाडली असून ग्रा.प. व पोलिस पथक आपले टार्गेट तर पूर्ण करत नाही ना असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शासकीय आदेशानुसार नियम मोडणार्‍यांवर ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत आहे. ८० हजार दंड वसुल असून. ४० हजार रुपये पोलिस कल्याण निधीसाठी पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाई सोबत आमच्या कर्मचार्‍यांना ग्रामपंचायतचे इतर कामे अअसल्यामुळे ते पूर्ण वेळ पोलिस प्रशासनासोबत काम करु शकत नाही. अधिक माहितीसाठी सरपंचांशी बोला.

देवचंद लोखंडे, ग्रामविकास अधिकारी, कुर्‍हा (पानाचे)

कुर्‍ह्यात ८० हजारांची वसुली

दरम्यान, कोविड-१९ ची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर तालुक्यात नियम मोडणार्‍यांवर संयुक्त करवाई होत आहे. त्यातून कुर्‍हा येथे साधारण ८० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून त्यातील आर्धी रक्क पोलिस प्रशासनाकडे देण्यात आली असून नियमित कारवाई सुरु असल्याची माहिती ग्राविअ देवचंद लोखंडे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com