भुसावळचा भारतात ४६ वा क्रमांक
जळगाव

भुसावळचा भारतात ४६ वा क्रमांक

सन २०१७ साली भुसावळ शहराला स्वच्छतेबाबत अग्रेसर म्हणून मिळाला होता पुरस्कार

Rajendra Patil

भुसावळ | प्रतिनिधी Bhusawal

स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत भुसावळ शहराचा संपूर्ण भारतात ४६ वा तर महाराष्ट्रातून १४ वा क्रमांक आला आहे.

केंद्र शासनाच्या आदेशातर्गत वेगवेगळे पथक स्वच्छता सर्वेक्षणासाठी येथे आले होते. विविध टप्प्यांमध्ये या पथकाने शहरातील स्वच्छता सर्वेक्षण केले, यात...

या पथकाने संपूर्ण शहराची पाहणी करत शहर हगणदारी मुक्तीचा सर्वे केला जातो. शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे स्वच्छतेबाबत शहरात काम करण्यात आले आहे अथवा नाही याची पडताळणी केली जाते.तसेच या सर्व गोष्टींना हे पथक वेगवेगळ्या पध्दतीने गुण देतात. याचबरोबर भुसावळ पालिकेला केंद्रातर्ङ्गे आलेल्या सुचनेप्रमाणे ऑनलाईन ङ्गिडिंग केले जाते.

या ङ्गिडिंगच्या पडताळणीसाठी आलेले पथक त्यांच्या पध्दतीने पडताळीण करून गुण देतात. स्वच्छता सर्वेक्षणात सर्वप्रथम भुसावळ शहराला सर्वात शेवटचा क्रमांक सन २०१६ मध्ये मिळाला होता. मात्र त्यानंतर स्वच्छते संदर्भात भुसावळ पालिकेने गांभीर्याने पावले उचलल्यामुळे सन २०१७ साली भुसावळ शहराला स्वच्छतेबाबत अग्रेसर म्हणून पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी शहराचा स्वच्छता सर्वेक्षणात ६९ वा क्रमांक होता. सर्वेेक्षण पथक शहराचा सर्वांगीण आढावा घेतात.

सन २०१९ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात भुसावळचा १३१ वा क्रमांक होता. तो आज २०२० मध्ये भारत देशात ४६ वा क्रमांक आला आहे.या कामी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी आ.संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे यांच्या मदतीने व भुसावळकर नागरिकांच्या सहकार्याने भुसावळ पालिकेने स्वच्छता सर्वेक्षणात आज हे स्थान मिळविले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com