सुनसगाव, ता. भुसावळ (वार्ताहर) Bhusawal

येथील शेतमजूर कर्ज काढून म्हशी घेऊन दुधाच्या व्यवसाय करण्याच्या तयारीत असताना डोक्यावर बचत गटाचे व खाजगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज झाल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

या बाबत माहिती अशी की , येथील धनगर वाड्यातील रहिवाशी भानुदास हरी कंखरे ( धनगर ) वय ४५ यांनी शेत मजुरी बरोबर दुय्यम व्यवसाय म्हणून पत्नीच्या नावावर बचत गटाचे व खाजगी फायनान्स कंपन्यांचे कर्ज काढून म्हशी घेऊन दुधाच्या व्यवसाय करण्याच्या तयारीत होते . त्यामुळे दररोज आपल्या म्हशीच्या गोठ्यात ते झोपत होते मात्र दि .२६ नोव्हेंबर रोजी सकाळी लवकर उठून म्हशींचे शेणपाणी करून आपले वडील घराकडे का आले नाही म्हणून त्यांची मुले निलेश व दिनेश म्हशीच्या गोठ्याकडे गेले असता त्यांना भानुदास कंकरे हे वायकरणाच्या झाडाला गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले असता आरडाओरडा केल्याने शेजारी व नातेवाईक गोळा झाले आणि जिवंत असेल या आशेवर यांनी सामान्य रुग्णालय जळगाव येथे नेले असता त्यांना गुलाबराव देवकर काॅलेज मध्ये नेण्यास सांगितले . गुलाबराव देवकर काॅलेज च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मयत घोषित केल्यावर सामान्य रुग्णालय जळगाव येथे प्रेताचे शवविच्छेदन. डॉ मिलिंद बारी यांनी केले या बाबत एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये शुन्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा वर्ग करण्यात आला आहे .या घटनेच्या पाहणी करण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार व कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे पो हे काॅ युनूस शेख व राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून जाबजबाब नोंदवीले आहेत . यावेळी पोलीस पाटील प्रकाश मालचे , जितेंद्र काटे हजर होते . घटनेचा पुढील तपास पो नि रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

सुनसगाव येथे दहा - बारा दिवसांपूर्वी दि १५ नोव्हेंबर रोजी धनगर समाजाच्याच समाधान उर्फ अण्णा पांडुरंग धनगर यांनी निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच धनगर समाजाच्या भानुदास कंकरे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी कर्जबाजारीपणा मुळेच आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे . मयताच्या पश्चात आई वडील पत्नी मुले भाऊ असा परिवार असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून या कुटुंबाने दिवस काढले होते ऐन चांगल्या दिवसात हा प्रकार घडल्याने कंखरे परिवारावर दुखःचा डोंगर कोसळला आहे .