ई संस्कार वाटीकेचा शुभारंभ

४४ देशातून अडीच लाख मुलांचा सहभाग
ई संस्कार वाटीकेचा शुभारंभ
डॉ संगीता बियाणी

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

गीता परीवार दक्षिणांचल अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनची बाल व किशोरी विकास समिती विप्र फौंडेशन महिला प्रकोष्ठ तथा वन बंधू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३० मे पर्यंत मुलांसाठी सर्वांगिन विकास तसेच संस्कार ज्ञान महायज्ञ आरंभ करण्यात आला आहे.

दक्षिणांचल अखिल भारतीय महेश्वरी महिला संघटनच्या प्रमुख कॉर्डिनेटर डॉ. संगीता मनोज बियाणी म्हणाल्या की, गीता परिवारद्वारा आयोजित ह्या कार्यक्रमात ४४ देशांमधील अडीच लाख मुलांनी सहभाग घेतला आहे.

हा उपक्रम ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांमुलीसाठी आहे. १००० व्हाट्सअप ग्रुप ने ह्या सर्व सहभागी मुलांना लिंक पाठवली जाते.

या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थी ह्या उपक्रमामध्ये सहभागी झाले लॉक डाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ज्ञांवर्धक, मनोरंजनात्मक, योगासने प्रार्थना, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, आर्ट, क्राफ्ट वर्क इत्यादी गोष्टी घर बसल्या मोबाईल च्या माध्यमातून शिकतील तसेच दररोज मुलांना एक प्रश्नोत्तरी दिली जाते त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पारितोषिक तसेच प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहेत. एक अद्वितीय व अद्भुत असा कार्यक्रम असल्याचे सांगितले.

या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने मुलांनी सहभाग नोंदवाव या उपक्रमाच्या प्रचार प्रसार व यशस्वीतेसाठी दक्षिणांचल सहा प्रभारी डॉ.संगीता बियाणी, सहयोगी संगीता मनिया, संतोष सोमानी, हेमा माहेश्वरी, सुमन कोठारी, प्रियंका मुंदडायांचा सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय प्रभारी निर्मला मारू तसेच दक्षिणांचलचे सर्व पदाधिकार्‍यांनी सदिच्छा दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com