नियमांचे पालन करत रमजान साजरा करा

शांतता समितीच्या बैठकीत डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांचे आवाहन
नियमांचे पालन करत रमजान साजरा करा
शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे सोबत आयपीएस अर्चित चांडक

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

देशात सध्या करोनाची दुसरी लाट सुरू आहे.जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळत आहे. या पार्श्‍वभुमीवर मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे.

करोनाचे गांभीर्य लक्षात घेता समाज बांधवांनी कोविड -१९ चे नियम पाळत रमजान महिना साजरा करावा असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आगामी रमजान महिन्याच्या निमित्ताने दि.१२ एप्रिल रोजी जुने प्रांताधिकारी कार्यालयात मुस्लीम समाजातील धर्मगुरू व समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांची बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीत कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नियमांचे पालन करत उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले. कुठल्याही प्रकारची गर्दी टाळत समाज बांधवांनी आपापल्या घरातच स्वतःची परिवाराची काळजी घेत रमजान साजरा करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रसंगी धर्मगुरूंनी आपले विचार व्यक्त करत प्रशासनास सहकार्य करण्याची सहमती दर्शविली. दरम्यान उत्सव काळात फळ, सुकामेवा तसेच भाजी पाल्याची मोठी मागणी असते. त्यामुळे परिसरात या वस्तंुंची उपलब्धता करून द्यावी. जेणे करून रमजान महिन्यात समाजबांधवांना अडचण निर्माण होणार नाही. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यास पोलिस प्रशासनाने सकारात्मकता दर्शवित नगरपालिका प्रशासनाशी चर्चा करून योग्य ही जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन श्री.वाघचौरे यांनी दिले. प्रसंगी सहाय्यक पोलिस अधिक्षक आर्चित चांडक, अब्दुल सईद अब्दुल लतिफ, मौलाना रेहान रजा, जमील शेख कालु, शे.पापा शे. कालू, शेख शरिफ शेख कालू, नदिमोद्दीन जहिरोद्दीन, साबीर शेख, शेख वाजीद, शेख सागीर आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com