भुसावळ : जिल्ह्याधिकार्‍यांनी केली ट्रॅामा केअर सेंटरची पाहणी
जळगाव

भुसावळ : जिल्ह्याधिकार्‍यांनी केली ट्रॅामा केअर सेंटरची पाहणी

आ.संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, डिवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धिवरे, डॉ.देवश्री घोषाल यांची उपस्थित

Rajendra Patil

भुसावळ - प्रतिनिधी - Bhusaval

अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी दि.१० रोजी, शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती.

जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत आज दि.१३ जुलै रोजी येथील ट्रॅामा केअर सेंटर भुसावळ येथे भेट देऊन आरोग्य व इतर यंत्रणेविषयक कामकाज तथा व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी आ.संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, डिवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धिवरे, डॉ.देवश्री घोषाल व मान्यवर उपस्थित होते.

मुबलक मनुष्यबळ व साधन सामुग्री असतांना सुद्धा शहरात फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व रेल्वे हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल केले जाताय, वसतिगृहात ऑक्सिजनची तोडकी व्यवस्था असून रेल्वे हॉस्पिटलमध्ये मोजक्याच सुविधा आहे. स्वतः कोरोना योध्या असलेल्या डॉक्टरांना व जवानांना सुविधा मिळाल्या नाही. बेड नसल्या कारणाने गोदावरीत ॲडमिट करा असे सांगण्यात आले.

लाखो रुपयांचा निधी खर्च करीत आ.संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी ट्रामा सेंटर उभे राहिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उदघाटन केले, परंतु कोविड सारख्या आजरावर सुविधा असतांना सुद्धा उपचार सुरू झाले नाही. या केंद्राला मिळालेले ३० ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा वापरात आणू शकले नाही. हे ट्रामा सेंटर कोविड उपचार केंद्र म्हणून लवकर सुरू करावे, अशी मागणी तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती याची त्वरीत दखल घेवून आज पाहणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी १३ रोजी ट्रामा सेंटरला भेट देऊन पहाणी केली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com