दीपनगर
दीपनगर
जळगाव

दीपनगर वीजनिर्मिती केंद्र चौथ्यास्थानी

विजेची मागणी १४ हजार मेगावँट ; निर्मिती ८७४१ वर

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या लाँकडाउन मुळे विजेची मागणी घटल्यामुळे दीपनगर वीज निर्मिती केंद्र शटडाऊन करण्यात आले होते.

नुकताच प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पातून शनिवारी ६९४ में.वँ. वीजेची निर्मिती करण्यात आली. ती राज्यातील वीज निर्मितीत चौथ्यास्थानी होती.

शनिवारी राज्यात वीजेची मागणी १४ हजार१४७ में.वँ. इतकी होती. मात्र निर्मिती ८ हजार ७३७ में.वँट. इतकी होती.

ही तुट भरून काढण्यासाठी एनटीपीसी कडून ५हजार ५००० में.वँ. वीज घेऊन तुट भरण्यात आली. राज्यात महाजेनको कडून करण्यात आलेल्या निर्मितीत दीपनगर प्रकल्प निर्मितीत चौथ्या स्थानी होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com