नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून 13 हजारांचा दंड वसुल

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून 13 हजारांचा दंड वसुल

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

शहरात ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. सकाळी सात ते अकरा दरम्यानच अत्यावश्यक सेवा खुली असल्याने त्यात देखील गर्दी करणारे, नियमांचे पालन न करणारे यांच्यावर कठोर कारवाई केली जात असून दिवसभरात नियमांचे उल्लंघन करणार्‍या 13 पेक्षा अधिक नागरिक व व्यापारी व वाहनधारकांवर सायंकाळ पर्यंत कारवाई करण्यात आली.

यातून तब्बल 13 हजार 100 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून विनाकारण फिरणार्‍यांना देखील पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागल.

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहरात नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यादृष्टीने पोलिस, नगरपालिका आणि महसूूल प्रशासनातर्फे संयुक्त पाच पथक नियुक्त करुन नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी शहरात गस्त वाढविली असून 17 रोजी सकाळपासूनच भाजी मार्केट, कापडामार्केट अशा विविध वर्दळीच्या ठिकाणी पथक तैनात करण्यात आले होते. शहरातील डेली मार्केट रात्रीच पोलिसांनी सील केले असून. त्याऐवजी पाच ठिकाणी बाजाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ऐरवी नागरिकांच्या गर्दीने गजबजणार्‍या डिस्को टॉवर ते अप्सरा टॉवर हा संपूर्ण परिसर अक्षरश: ओस पडला होता.

नाकाबंदी- हरात बाजारपेठ पोलिस ठाणे चौक, महात्मा गांधी पुतळा, नाहाटा चौफुली, रजा टॉवर आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी बॅरिकेट्स लावून सव्वा अकरानंतर हे पॉईंट सक्रिय होऊन विनाकारण फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्ीत 5 असे एकूण सात पथके नियुक्त करुन, बाजारात गस्त वाढविण्यात आली. यावेळी उशिरापर्यंत दुकान सुरु ठेवणार्‍या तीन दुकानदारांकडून 3 हजार 300, मास्क न वापरणार्‍या 11 यणांकडून 2 हजार 200 तर चेकपोस्ट कारवाईतून 7 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

पाच ठिकाणी भरला बाजार -शहरात डेली मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने मध्यवर्ती बाजार बंद करुन, भाजी बाजाराचे पाच ठिकाणी विकेंद्रीकरण केले आहे. त्यामुळे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, टिव्ही टॉवर मैदान, भुसावळ हायस्कूल आणि जामनेर रोड याठिकाणी बाजारासाठी जागा देण्यात आली आहे. पालिकेने ठरवून दिलेल्याठिकाणी आज बाजार भरविण्यात येऊन सकाळी 11 वाजता बंद करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com